पाकच्या विरोधानंतर संयुक्त राष्ट्राने सांगितलं, प्रियांकाला मत मांडण्याचा पूर्ण अधिकार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नुकतीच प्रियंका चोपडा हिला संयुक्त राष्ट्राच्या सदिच्छा दूत या पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मझारी यांनी केली होती. परंतु यानंतर आता संयुक्त राष्ट्रांनी प्रियंकाचं समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, “प्रियंकाला स्वत:चे मत मांडण्याचा पू्र्ण अधिकार आहे.

संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन डुजारीक यांना संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी प्रियंका चोपडाबद्दला प्रश्न विचारला असता त्यांनी प्रियंकाचं समर्थन करत म्हटलं की, “जेव्हा संयुक्त राष्ट्राचे सदिच्छा दूत एखाद्या मुद्द्यावर वैयक्तिक पातळीवर बोलतात तेव्हा त्यांना त्यांचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो.” पुढे ते म्हणाले की, “सदिच्छा दूत जेव्हा वैयक्तिक गोष्टीवर किंवा समस्येवर भाष्य करतात तेव्हा ती त्यांची वैयक्तिक मते असतात. पंरतु जेव्हा ते संयुक्त राष्ट्राचे दूत म्हणून व्यासपीठावर बोलतात तेव्हा संयुक्त राष्ट्राच्या विचारसरणीला धरून निपक्षपणे मत मांडणं अपेक्षित असतं.”

काय आहे प्रकरण ?
प्रियंकाने काश्मीर प्रश्नी भारत सरकारच्या भूमिकेचे आणि पाकिस्तानला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे जाहीर समर्थन केले होते. यानंतर ‘युनिसेफची दूत या नात्याने प्रियंका चोपडाने शांततेचा पुरस्कार करायला हवा. परंतु तिची भूमिका मात्र या तत्त्वांच्या विरोधात आहे. म्हणून तिला पदावरून हटवण्यात यावे’ अशी मागणी शिरीन मझारी यांनी पत्राद्वारे केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like