लवकरच प्रियांका चोप्रा होणार ‘आई’, फॅमिल प्लॅनिंगबद्दल म्हणाली….

मुंबई : पोलीसनामा ऑललाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खुपच चर्चेत आहे. तिचे पती निक जोनसची शानदार बॉंन्डिंग पहायला मिळते. दोघेही एकमेकांशी खुप प्रेम करतात. दोघेही एकमेकांचा खुप आदर करतात. हे सगळ्यांना माहितच आहे. प्रियांकाने निक जोनस सोबत फॅमिली प्लॅनिंगसाठी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तसंथने दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीत प्रियांकाने फॅमिली प्लॅनिंगवर म्हणाली की, मला आई होण्याची इच्छा आहे. याआधी एका शो मध्ये निकने लवकरच बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेणेकरुन निक त्याचे अनुभव त्याच्या मुलांसोबत करु शकेल.

नुकताच ‘मेट गाला 2019’ कार्यक्रमात प्रियांकाने सहभाग घेतला. त्यामध्ये तिच्या लुकने सगळ्यांना थक्क केले. यामध्ये प्रियांकाने सिल्वर पेस्टल गाउन परिधान केला होता. तिचा मेकअप खुपच छान झाला होता. प्रेक्षकांनी प्रियांकाच्या लुकला युजर्सने खुप ट्रोल केले होते. ‘मेट गाला’ इव्हेंटमध्ये प्रियांका तिचे पती निक जोनससोबत आली होती. प्रियांकाच्या या लुकला युजर्सने ट्रोल केले व तिची खुप खिल्ली उडविली.

प्रियांका आणि निकने डिसेंबर २०१८ मध्ये जोधपुरच्या उम्मैद भवन येथे लग्न केले. लग्नानंतर त्यांनी रिसेप्शन व पार्टिचे आयोजन केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल झाले. काही दिवसांपुर्वी Sucker नावाने निकच्या परिवाराने म्यूजिक व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक दोघे सोबत स्क्रिन शेअर करताना दिसले.