स्मृती इराणींनींकडून अमेठीत चपलांचे वाटप, प्रियंका गांधींचा आरोप

अमेठी : वृत्तसंस्था – अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये स्मृती इराणी यांनी चपला वाटून जनतेचा अपमान केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच यातून इराणी यांनी राहुल गांधींना खिजवण्यासाठी केल्याचेही प्रियंका गंधी म्हणाल्या. फुरसतगंजमधील एका सभेत त्या बोलत होत्या.

स्मृती इराणी यांनी चपला वाटल्या, यासाठी की त्यांना वाटत की अमेठीत लोकांकडे साधी चप्पल नाही. असे करून त्यांना वाटेल की त्या राहुल गांधींचा अपमान करत आहेत. खरं तर त्यांनी अमेठीचा अपमान केला आहे. अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेने कुणाकडेच भीक मागितली नाही. तसेच तुम्ही आता इराणींना धडा शिकवा की अमेठी आणि रायबरेलीची जनतेचा स्वाभिमान जागा झाला आहे. असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

स्मृती इराणी अमेठीत गेल्या होत्या तेव्हा त्यांनी सांगितले की अमेठीतल्या एका गावाचा सरपंच त्यांना दिल्लीत भेटला होता. तो आला तेव्हा त्याच्या पायात चप्पलही चांगली नव्हती. तेव्हा मी त्यांना चांगल्या चपलेची व्यवस्था करून दिली आणि गावाच्या विकासासाठी १६ कोटींचा निधी मिळवून दिला.