Problem Of White Discharge | व्हाईट डिस्चार्जने त्रस्त असाल तर ‘या’ 5 आयुर्वेदिक उपायांनी करा उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Womens Health | टीनएजमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातील एक पांढर्‍या स्त्रावाची समस्या (Problem Of White Discharge) होय. तिला वैद्यकीय भाषेत ल्युकोरिया (Leucorrhoea) म्हणतात. यापैकी बहुतेक समस्या टीनएज मुलींना (teenage girls) होतात. थोडासा पांढरा स्त्राव होणे ही काही मोठी समस्या नाही, परंतु जास्त होणे ही चिंतेची बाब आहे. जास्त पांढरा स्त्राव शरीरात अशक्तपणा आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतो, म्हणून त्याची लक्षणे ओळखून त्यावर त्वरित उपचार करणे आवश्यक आहे. (Problem Of White Discharge)

 

कोणता स्त्राव होऊ शकतो मोठी समस्या :
स्त्रियांना थोडा स्त्राव होणे ही समस्या नाही, परंतु जर स्त्राव घट्ट आणि जास्त असेल किंवा त्याच्या रंगात बदल झाला असेल तर समस्या वाढू शकते. पांढर्‍या जाड स्त्रावामुळे योनीत यीस्टचा संसर्ग (Vagina Yeast Infection) होऊ शकतो. (Problem Of White Discharge)

 

व्हाईट डिस्चार्जची कारणे :
पांढर्‍या स्रावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे योनीमार्गाची साफसफाई न करणे, जास्त ताण, शरीरात पोषक तत्वांची कमतरता यामुळे पांढर्‍या स्रावाची समस्या होते. या समस्येमुळे, महिलांना चक्कर येणे, थकवा, अशक्तपणा, योनी भागात खाज सुटणे, डोकेदुखी आणि बद्धकोष्ठता जाणवू शकते. जर तुम्हालाही पांढर्‍या स्रावाची समस्या असेल तर त्यासाठी घरगुती उपाय करा.

पांढऱ्या स्त्रासाठी घरगुती उपाय (Reasons for white discharge)

1. मेथीच्या पाण्याचे सेवन करा :
मेथीदाणे (Fenugreek) पाण्यात उकळून ते पाणी सेवन केल्यास पांढर्‍या स्रावाची समस्या दूर होते. मेथीचे दाणे 500 मिली पाण्यात पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. नंतर हे पाणी थंड झाल्यावर प्या.

 

2 भेंडीचे करा सेवन :
पांढर्‍या स्त्रावासाठी भेंडी (Okra) हा उत्कृष्ट उपचार आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी भेंडी पाण्यात उकळून मिक्सरमध्ये वाटून सेवन करा, पांढरा स्त्रावची समस्या दूर होईल.

 

3. केळी खा :
टीनएज मुलींमध्ये पांढरा स्त्राव जास्त असेल तर केळी खावी. नाश्त्यात केळी (Banana) खाल्ल्याने या समस्येवर मात करता येते. गावठी तुपात भिजवलेले पिकलेले केळे खाल्ल्यास लवकर आराम मिळेल.

 

4. धने सेवन करा :
धने (Coriander) रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी सेवन करा. पांढर्‍या स्त्रावावर धन्याचे पाणी सेवन करणे हा सर्वोत्तम आणि सोपा उपचार आहे.

5. आवळा सेवन करा :
आवळा (Amla) हे एक सुपरफूड आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात.
आवळा इम्युनिटी मजबूत करतो, तसेच शरीर निरोगी ठेवतो.
तुम्ही कच्चा आवळा, पावडर, मुरंबा किंवा कँडीजच्या स्वरूपात खाऊ शकता.
आवळ्याचे नियमित सेवन केल्याने पांढर्‍या स्रावापासून मुक्ती मिळते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Problem Of White Discharge | know 5 best home remedies for leucorrhoea or white discharge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pre-Diabetes Diet | प्री-डायबिटीज असेल तर आजच ‘या’ 8 फूड्सपासून राहा दूर

Weight Loss Drink | वजन कंट्रोल करते नारळ पाणी, जाणून घ्या आरोग्याला कसा होता फायदा

Ind Vs Aus T20 | कोहलीने कॅच सोडताच रोहितने त्याची जागा बदलली, दुसऱ्याच चेंडूवर विराटने केले असे काही..