Property Registration-Gunthewari | महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला ‘मुहूर्त’, सोमवार पासून गुंठेवारीची नोंदणी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Property Registration-Gunthewari | राज्य सरकारने (Maharashtra Government) गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा आदेश ऑक्टोबरमध्ये दिला होता. मात्र, पुणे महापालिकेकडून (Pune Corporation) या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. अखेर महापालिकेकडून गुंठेवारीतील (Gunthewari Pune)बांधकामे नियमित (Property Registration-Gunthewari) करण्याची प्रक्रिया येत्या सोमवार (दि.10) पासून करण्यात येणार आहे. ही नोंदणी ऑनलाईन (Online Registration) पद्धतीने होणार असून, यासाठी नागरिकांनी आर्किटेक्टची (Architect) मदत घेऊन त्यांचा प्रस्ताव सादर करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी पुढील तीन महिने मुदत असणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पुणे महापालिकेमध्ये (PMC) सोमवारी (दि.3) गुंठेवारीतील बांधकामे नियमीत करण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी यासंदर्भात माहिती दिली. महापौर म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार, बांधकामे नियमित करण्यासाठी पद्धती निश्चित केली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांसह जुन्या हद्दीतील सर्व अर्ज ऑनलाईन स्विकारले जाणार आहेत. (Property Registration-Gunthewari)

तरच बांधकामे नियमित होतील

न्यायालयाच्या आदेशानुसार (Court Order) विमानतळाच्या सीमा भिंतीपासून (Airport Boundary Wall) 100 आणि बॉम्ब डंपच्या (Bomb Dump) सीमा भिंतीपासून 900 मीटर क्षेत्रात झालेली बांधकामे आणि विमानतळाच्या फनेल झोनमध्ये (Airport Funnel Zone) असलेली बांधकामे नियमित करण्यासाठी संरक्षण खात्याचे (Defense Department) ना हरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) आवश्यक आहे. ना हरकत प्रमाणपत्र असेल तरच ही बांधकामे नियमती केली जाणार आहेत. पुढील तीन महिने अर्ज स्विकारले जाणार असून यानंतर एकत्रित सर्व अर्जांची छाननी केली जाईल. त्यासाठी प्रतिगुंठा 1500 रुपये शुल्क निश्चित केले आहे.

एजंटच्या नादाला लागू नका- महापौर

गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करताना कोणत्याही एजंटच्या (Agent) नादाला लागू नका, आर्किटेक्टच्या मदतीने ऑनलाइन अर्ज करावेत, हे अर्ज स्विकारले जातील. आर्किटेक्टने एका अर्जासाठी 5 हजार रुपयांपेक्षा अधिकचे शुल्क आकारु नये, अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

Web Title : Property Registration Gunthewari | pune corporation property registration Gunthewari pune PMC Gunthewari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी