PUBG Banned : व्हिडीओ गेम्स खेळणार्‍यांसाठी आहेत ‘हे’ 3 ऑप्शन्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मोदी सरकारने लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप पबजीसह 118 अन्य मोबाइल अ‍ॅपवर बुधवारी प्रतिबंध लावला आहे. यास सार्वभौमत्व, अखंडता आणि सरंक्षणाच्या दृष्टीने धोकादायक माणून बंदी घालण्यात आली आहे. एका अधिकृत वक्तव्यानुसार, प्रतिबंधित अ‍ॅपमध्ये बायदू, बायदू एक्सप्रेस एडिशन, टेन्सेंट वॉचलिस्ट, फेसयू, वीचॅट रिडिंग आणि टेन्सेंट वेयुन, तसेच पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाइट यांचा समावेश आहे.

सूत्रांनी सांगितले की, हे सर्व प्रतिबंधीत अ‍ॅप, चीनशी संबंधित आहेत. सरकारने यापूर्वी टिकटॉक आणि यूसी ब्राऊझरसह चीनच्या अनेक अन्य अ‍ॅपवर प्रतिबंध लावला होता. सरकारने 118 अशा अ‍ॅपवर प्रतिबंध लावला आहे, जी भारताची सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्यांची सुरक्षा आणि शांतता सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत.

या बातमीमुळे पबजी प्लेयर्सने निराश होण्याची गरज नाही, कारण या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला काही अल्टरनेटीव्ह गेम सांगणार आहोत…

1 Garena Free Fire
हा जगातीली सर्वात पॉप्युलर मोबाइल गेम्सपैकी एक आहे, ज्याने खुप लोकांना आकर्षित केले आहे. हा जास्त डाऊनलोड करण्यात आलेला गेम आहे. या गेमचे गुगल स्टोअरवर 500 मिलियनपेक्षा जास्त डाऊनलोड आहेत. हा गेम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे खेळला जातो.

2 Black Survival
हा एक सर्व्हिवल गेम आहे, जो तुम्हाला तुमच्यात पूर्णपणे गुंतवूण ठवतो. हा गेम कोरियाच्या आर्चबिअर कंपनीने बनवला आहे. तो पबजी मोबाइलसाठी योग्य पर्याय आहे. या गेमला पूर्णपणे बॅटल रॉयल गेम म्हणता येणार नाही, परंतु तरीसुद्धा गेम खेळताना मजा येते.

3 Call of Duty
या गेमचे एक आपले जग आहे. याचे मोबाईल व्हर्जन ओरिजनल गेमसारखा अनुभव देईल. चीनी कंपनी टेन्सेट द्वारे डेव्हलप करण्यात आलेला हा गेम चांगले फीचर्स आणि रेअलीस्टिक गेमप्लेचा अनुभव देईल. गेममध्ये अनेक मोड आहेत.