भोंदू डॉक्टरसाठी जमावाकडून जाळपोळ, मृत मुलाला जिवंत करण्याचा दावा

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन  – सर्पदंशाने मृत झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा एका आयुर्वेदिक डॉक्टरने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भोंदू डॉक्टरसह तीन जणांना अटक केली होती. मात्र घोटी येथील नागरिकांनी या डॉक्टरांना त्वरित सोडण्याच्या मागणीसाठी गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच गोंदिया-कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनता हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावर टायर जाळत पोलिसांवर दगडफेक केली. अखेर या संंतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c8c1254-d1f2-11e8-8092-797a37ed7ee9′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की गोंदियातील घोटी, गोरेगाव येथे आदित्य गौतम या आठ वर्षीय बालकाला सर्पदंश झाल्याने त्यास बाई गंगाबाई रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान बालघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्पदंशाने मृत बालकाला २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. यासाठी बालाघाटावरून ते आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत गोरेगाव येथे आले.

मुंबई विद्यापीठाचा गजब कारभार गेल्या वर्षी 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं !

एकदा मृत झालेला व्यक्ती परत जिवंत होत नसून ही अंधश्रध्दा आहे. यामुळे गोरेगाव पोलिसांनी डॉ. लिल्हारे व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी डॉ. लिल्हारे यांना घोटी येथे पोहोचू न दिल्याने बालकाचे प्राण वाचविता आले नाही असा आरोप करत नागरिकांनी मंगळवारी गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला तसेच गोंदिया-कोहमारा मार्गावर टायर जाळून दगडफेक केली.

[amazon_link asins=’B0725RBY9V’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’79af91ac-d1f2-11e8-9c22-cf6fde1e93ae’]

मृत बालकावर या डॉक्टरला उपचार करू न देता त्यास ताब्यात घेतल्यामुळे नागरिक पोलिसांवर संतप्त झाले. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्याकरिता सौम्य लाठीमार केला. परिस्थिती चिघळू नये याकरिता आमगाव, डुग्गीपार, गोंदिया आणि गोरेगाव येथील पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. अंधश्रद्धेतून झालेल्या प्रकारामुळे नागरिकांच्या मानसिकतेचा मोठा प्रश्न या ठिकाणी उघड झाला आहे.