सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची वायसीएम रुग्णालयास भेट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’ने चांगलेच डोके वर काढले आहे. आता पर्यंत सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून याची माहिती कळताच राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आज मंगळवारी तातडीने पिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयास (वायसीएम) भेट दिली. दुपारी एक ते तीन या दोन तासात त्यांनी वायसीएमच्या दुस-या मजल्यावरील अतिदक्षता (आयसीयु) विभागातील रुग्णांची परिस्थिती जाणून घेतली. तसेच स्वाईन फ्लू अटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांनी तत्पर राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’77c82fc8-aac4-11e8-856e-b563e872ceb8′]

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढली आहे. याची माहिती मिळताच आरोग्य मंत्री सावंत यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी दौरा नियोजित केला होता. सकाळी पुण्यातील आरोग्य भवन याठिकाणी वैद्यकीय विभागातील डॉक्टरांची बैठक घेतली. त्यावर पुण्यात दहा स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्याचे समोर आल्याने त्यांनी डॉक्टरांना या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दुपारी एक वाजता पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाला भेट दिली.
नालासोपारा स्फोटकं प्रकरण, आरोपींकडून सनबर्नमध्ये घातपाताचा कट

वायसीएममध्ये महापालिकेच्या डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांनी शहरात स्वाईन फ्लूमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी वायसीएमच्या पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता (आयसीयु) विभागातील रुग्णांच्या आरोग्याची माहिती घेतली. रुग्णालयाच्या दुस-या मजल्यावर सुरु असलेल्या मेडिकल कॉलेजचे कामकाज त्यांनी पाहिले. तब्बल दोन तास मंत्री सावंत यांनी पालिकेच्या रुग्णालयातील कामकाजाची माहिती घेऊन डॉक्टरांना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, त्याच बरोबर डॉ. प्रदिप औटी SSO, डॉ.संजय देशमुख उपसंचालक आरोग्य आदी उपस्थित होते.