सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते, शिवसेना विधिमंडळ गटनेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वागळे इस्टेट स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार असून अंत्ययात्रा एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाहून सकाळी ११ वाजता निघणार आहे.

एकनाथ शिंदे हे डहाणु येथे प्रचारात होते. त्यावेळी त्यांना आईच्या निधनाचे वृत्त समजले. त्यानंतर ते तातडीने ठाण्याला आले.
त्यांच्या मागे पती संभाजी शिंदे, पुत्र एकनाथ शिंदे, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे, एक मुलगी, सून लता शिंदे, अन्य दोन सुना, नातू विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातवंडे असा परिवार आहे. आजारपणामुळे त्या १० दिवसांपासून ठाण्याच्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. या उपचारादरम्यान बुधवारी रात्री ११ वाजता त्यांचे निधन झाले. कल्याणचे खासदार आणि उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या त्या आजी होत.

Loading...
You might also like