पुलवामा हल्ल्यातून धडा घेऊन CRPF नं केले ‘हे’ मोठे बदल, सुरक्षा यंत्रणा केली आणखी ‘मजबूत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात 14 जवान शहीद झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. यानंतर याच्यावर कारवाई करताना भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैशेच्या कॅम्पवर जोरदार हल्ला केला होता.

सरकारने दावा केला होता की भारताने केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे सर्व दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले होते. मात्र, पुलवामा हल्ल्याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तत्कालीन राज्यपाल म्हणाले की या घटनेपूर्वी काही गुप्तचर माहिती प्राप्त झाली होती, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे देशाच्या गुप्तचर यंत्रणेने याबाबत माहिती का दिली नाही ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. याच अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेत अनेक महत्वाचे बदल करण्यात आले.

कोणत्या प्रकारचे बदल करण्यात आले ?
पुलवामा मधून धडा घेऊन आता सीआरपीएफच्या जावांनाना विमानाने पाठवले जात आहे. त्याच अनुषंगाने जवानांना एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीवरून ये जा करण्याची सुविधा मोफत करण्यात आली आहे. तसेच आठवड्यातून तीन वेळा जम्मू ते श्रीनगर आणि श्रीनगर ते जम्मू अशा प्रकारे एअर इंडियाची विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच जर एखाद्या जवानाने खाजगी विमान कंपनीने प्रवास केला तर बिल जमा केल्यानंर त्या जवानाला प्रवास शुल्क देण्याची सुविधा देखील सुरु करण्यात आली आहे.

मात्र अजूनही सीआरपीएफला आवश्यक असलेल्या सामानाची वाहतून रस्त्यावरूनच केली जाते. सीआरपीएफ ने एंटी सैबोटोज़ टीमची संख्या देखील वाढवलेली आहे. ज्यामध्ये बाहेरील लोकांना घुसण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

एवढेच नाही रुटवरील IED चा धोका लक्षात घेऊन सीआरफाएफने कॉन्वॉय मूवमेंटच्या वेळी लिंक रोडला बंद करण्याचा आदेश दिला आहे. सीआरपीएफ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवाहर टनल पासून श्रीनगर नॅशनल हायवे पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. ज्यामुळे सुरक्षा दलाला प्रत्येक हालचालींवर लक्ष देता येते.

या व्यतिरिक्त तुकडीतील गाड्यांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुलेट प्रूफ एंटीमाईन वेहिकलची संख्या दुपट्ट करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून अजूनही भारतीय जवानांना टार्गेट करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे सुरक्षा दल सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला उत्तर देण्याच्या तयारीत आहे.