Pune : MBBS प्रवेशाच्या बहाण्याने तरूणीसह इतरांची 1.25 कोटीची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बोपोडीत राहणाऱ्या एका तरुणीला MBBS ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या दोन भामट्यांनी या तरुणीसोबतच आणखी चौघांना फसवले आहे. या फसवणूकीचा आकडा सव्वा कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

हा सर्व प्रकार गेल्या वर्षी घडला आहे. त्यात आता गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी सुहाष नारायण ओव्हाळ (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात राहुल यादव व समीर सिंग या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बोपोडी भागात राहतात. त्यांच्या मुलीला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. यावेळी त्यांची आरोपीशी संपर्क झाला. त्यानंतर या आरोपीने या तरुणीच्या वडीलांना तुमच्या मुलीला प्रवेश मिळवून देऊ, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तर त्यांच्याकडे प्रवेश मिळवून देण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादी यांच्या सारखेच आणखी 5 जणांना अश्याच प्रकारे एमबीबीएसला प्रवेश घेऊन देऊ, असे सांगत या सहा जणांकडून एकूण 1 कोटी 31 लाख 37 हजार रुपये घेतले. मात्र त्यांना प्रवेश मिळवून दिला नाही. यावेळी फिर्यादी यांनी याबाबत विचारले असता त्यानी टाळाटाळ करण्यास सुरुवारत केली. त्यावेळी फिर्यादी यांना प्रवेश मिळवून न देता त्यांची फसवणूक केली.

त्यांनतर यांनी पोलिसांकडे अर्ज दिलंस होता. या अर्जावर प्राथमिक चौकशी करण्यात आमी. त्यानुसार  या प्रकरणी, गुन्हा दाखल केला करत अधिक तपास सुरू केला आहे.