पोलीसनामा ‘इम्पॅक्ट’ ! अखेर ‘कडक’ कारवाई करणारे ‘ते’ 2 पोलिस कर्मचारी ‘तडकाफडकी’ निलंबीत, DB इन्चार्जवर वरिष्ठ ‘मेहरबान’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – तडीपारीची कारवाई झालेल्या गुंड अन् खडक पोलिसांच्या ‘डीबी’ पथकानेे संगनमतकरून एका निष्पाप तरुणाला अश्लील शिवीगाळ, मारहाण तसेच 24 तास लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पोलिसनामा वेबपोर्टलने सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल घेऊन वरिष्ठांनी तत्काळ कारवाई केली आहे. मात्र, याप्रकरणात डीबी ईंचार्ज सहाय्यक निरीक्षकावर वरिष्ठ सध्या तरी वरिष्ठ मेहरबान असल्याचे दिसत आहे.

पोलीस नाईक राहुल धोत्रे आणि पोलीस शिपाई संदीप कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

घोरपडी पेठेतील 22 वर्षीय तरुणाला पोलिसांच्या अभिलेखावरील गुंड महिंद्र उर्फ वॉस्को कांबळे याने आणि डीबीच्या धोत्रे आणि कांबळे यांनी माशे आळी येथून शिविगाळ करून चौकीत नेले. तेथे त्याला गुंड वॉस्को कांबळे आणि त्याच्या पत्नीने शिवीगाळ केली. त्यावेळी पोलिसांनीही या तरुणाला मारहानकरून शिवीगाळ केली. त्यानंतर 1 तासाने त्याला पोलीस ठाण्यात नेले. माशे आळीतून नेते वेळीच तेथील एका बंद गाड्यावरून दोन कोयतेही नेले होते. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्याला डीबी ईंचार्ज राठोड यांच्यासमोर उभा केले. त्यानंतर त्याला बाहेर आणण्यात आले. कहाणी वेळानेच तरुणाला गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. अन्यथा गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगितले. त्यानंतर तरुणाला तडीपार केलेल्या एका मित्रानेच धोत्रे यांना फोनकरून मध्यस्थी केली आणि 15 हजार रुपये देऊन त्याची सुटका केली. त्या काळात या तरुणाला तबल 24 तास लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. पैसे दिल्यानंतरच त्याची लॉकअपमधून सुटका करण्यात आली.

पीडित तरुणाच्या बहिणीने सोने गहाण ठेऊन हे पैसे दिले होते. दरम्यान बाहेर आल्यानंतर या तरुणाने थेट पोलीस आयुक्तांकडे पुराव्यानिशी तक्रार देऊन न्याय मागितला होता. त्याच दरम्यान पोलिसनामाच्या हाती हे प्रकरण लागले होते. पोलिसनामा वेबपोर्टलने याचे सविस्तर वृत्त प्रसारित केल्यानंतर त्याची दखल घेऊन त्याच दिवशी दोन कर्मचार्यांवर कारवाईकरून तडकाफडकी त्यांचे खात्यातून निलंबन केले आहे.

 

डीबी ईंचार्जवर वरिष्ठ मेहरबान
शहरात एखाद्या हद्दीत अवैध धंदे आढळले तरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक यांना जबाबदार धरून पोलीस आयुक्त कारवाई करतात. त्यांची उचलबांगडीही करण्यात येते. मात्र खडक पोलिसांच्या डीबी पथकाचे ईंचार्ज सहायक निरीक्षक राठोड यांच्यावर मात्र काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.

त्यांच्यासाठी ज्यांनी पैसे मागितले त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ त्यांच्यावर मेहरबान का अशी चर्चा पोलीस दलात सुरू झाली आहे. थेट रेकॉर्डिंग असताना त्यांना या कारवाईतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा देखील होऊ लागली आहे. त्यामुळे आता पुढील काळात नेमकी डीबी ईंचार्जवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like