आम आदमी पक्षाची 7 उमेदवारांची यादी जाहीर, पुणे, ठाणे व सोलापूर जिल्हयातील मतदार संघाचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. युती आणि आघाडीत जागावाटपाची जोरदार चर्चा सुरूआहे. दरम्यान, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षानं त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आम आदमी पक्षाकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, ठाणे आणि सोलापूर जिल्हयातील मतदार संघाचा समावेश आहे. आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.

आम आदमी पक्षाकडून 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. उमेदवाराचे नाव आणि त्यापुढील कंसात मतदार संघ पुढील प्रमाणे –

कैलास फुलारी (जालना), नरेंद्र भांबवानी (मिरारोड – ठाणे जिल्हा), मुकूंद किर्दत (शिवाजीनगर – पुणे शहर), गणेश ढमाले (वडगावशेरी – पुणे शहर), अ‍ॅड. खतिब वकिल (मध्य सोलापूर), डॉ. सुनिल गावित (नवापुर) आणि डॉ. अल्तामाश फैजी (मुंब्रा – कळवा).

Visit : Policenama.com