Pune : शहरात घरफोडया करणार्‍या चोरटयांचा ‘हौदोस’ ! वारजे, कोथरूड व हडपसर परिसरातील 4 फ्लॅट फोडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा हैदोस सुरूच असून, वेगवेगळ्या ठिकाणी चार बंद फ्लॅट फोडले आहेत. वारजे, कोथरूड व हडपसर भागात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी संतोष बबन पासलकर (वय 39) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष हे शिवणे येथे राहतात. त्यांचा वारजे चौक परिसरात फ्रॅब्रिकेशनचा कारखाना आहे. ही कंपनीतील भागिदारीत चालवितात. सोमवारी रात्री कारखाना बंद केला. यानंतर रात्री अज्ञात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच कंपनीतले ग्रॅन्ड मशीन व वायर असा 45 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला. तर वारजे मधील राजू परशूराम वीर (वय 35) यांचे देखील वेल्डींग वर्क शॉप फोडले आहे. चोरट्यांनी वर्क शॉपचा चोरट्यांनी पत्रा कापून आत प्रवेश केला. तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेली 40 हजार रूपयांची रक्कम चोरून नेली. अधिक तपास वारजे पोलिस करत आहेत.

कोथरूड येथील लौकित सोसायटीत राहणाऱ्या गीता चॅटर्जी यांचा बंद फ्लॅट फोडला आहे. याप्रकरणी सोसायटीचे चेअरमन मनोजकुमार बाबुलाल शहा (वय 57) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चॅटर्जी या करोनामुळे मुलीकडे गेल्या आहेत. त्यांच्या फ्लॅटमधून चोरीला काहीही गेलेले नाही. तर चौथी घटना हडपसर परिसरात येथे घडली आहे. मांजरी फार्म पोस्ट ऑफीसचा दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न केला. चोरट्यांना तिजोरी उघडता न आल्यामुळे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. याप्रकरणी पोस्ट मास्तर राहूल विठ्ठल जाधव (वय 33) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like