Pune : पूर्वी झालेल्या भांडणातून 25 वर्षीय तरुणाचा सपासप वार करून खून; आंबेगाव पठार परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पूर्वी झालेल्या भांडणातून एका 25 वर्षीय तरुणाचा वारकरून खून करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दोन ते तीन आरोपी असल्याची माहिती असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. मारेकरी फरार झाला आहेत.  शहरात कडक संचारबंदी असताना खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

सौरभ लेकावळे (वय 25, रा. कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेकावळे आणि आरोपीचे पूर्वीचे वाद आहेत. संग्राम हा मिळेल तो कामे करत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, आंबेगाव पठार परिसरात सायंकाळी आरोपींनी त्याला गाठले. तसेच पूर्वीच्या कारण काढून वाद घातला. यानंतर त्याच्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मारेकरी पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. संचारबंदीत खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.