Pune ACB Trap | अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त देसाई 10 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील (Food and Drug Administration (FDA) सहाय्यक आयुक्ताला 10 हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB News) रंगेहाथ पकडले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap)

 

साहेब एकनाथराव देसाई (Saheb Eknathrao Desai) असे ताब्यात घेण्यात आलेल्या सहाय्यक आयुक्ताचे नाव आहे. यासंदर्भात 54 वर्षीय व्यक्तीने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे कंपनीचे मार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता. सदरील अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्त (अन्न) साहेब देसाई यांनी त्यांच्याकडे 10 हजार रूपयांची मागणी केली. (Pune ACB Trap)

 

त्यानंतर त्यांनी 10 हजार रूपयाची लाच घेतली असता अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले (Pune Crime News).
अ‍ॅन्टी करप्शनच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर अधीक्षक सुरज गुरव
यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune Bribe Case)

 

Web Title :- Pune ACB Trap | Assistant Commissioner of Food and Drug Administration Saheb Eknathrao Desai caught in anti-corruption net while accepting bribe of 10 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | ‘… तर 2024 ची निवडणूक शेवटची ठरु शकते’, उद्धव ठाकरेंचं मोठं विधान (व्हिडिओ)

MP Sanjay Raut | संजय शिरसाट यांनी संजय राऊतांची तुलना केली पिसाळलेल्या कुत्र्याशी, म्हणाले – ‘इंजेक्शन द्यावं लागेल’

Pune Crime News | 24 वर्षाच्या तरुणीचा नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलीस आणि नागरिकांमुळे तरुणी बचावली

Pune Crime News | सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली दरोडेखोरांची टोळी कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 4 दुचाकीसह कोयता, तलवार जप्त