पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) लवकर काढून देण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरणाच्या नागरी सुविधा केंद्रातील ऑपरेटरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने (Pune ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.) निगडी येथील नागरी सुविधा केंद्रात केली. (Pune Bribe Case)
शैलेश अकांबरी बासुटकर (वय-41) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव आहे. याबाबत 25 वर्षीय महिलेने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या दोन लहान बहिणींचे जातीचे दाखले लवकर देण्यासाठी शैलेश बासुटकर याने चार हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांन लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. पुणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि गुरुवारी (दि.2) पडताळणी केली असता शैलेश बासुटकर याने चार हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने नागरी सुविधा केंद्रात सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून लाच घेताना शैलेश बासुटकर याला रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे
(SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे
(Police Inspector Sandeep Varhade),
पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (Police Inspector Praveen Nimbalkar),
महिला पोलीस हवालदार पौर्णिमा साका, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश माने, चालक ASI जाधव यांच्या पथकाने केली
Web Title :- Pune ACB Trap | Operators of civic facilities centers caught in anti-corruption net while taking Rs 4,000 bribe for providing caste certificates
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Aaliyah Kashyap | ‘या’ दिग्दर्शकाची मुलगी बी टाउन अभिनेत्री दिशा पाटनीलाही देते टक्कर; फोटो व्हायरल