Pune News : सारसबागेच्या गेटसमोरच दुचाकीस्वाराला डंपरने चिरडले, डोक्यावरून चाक गेल्याने ‘चेंदा-मेंदा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सारसबागेच्या गेटसमोरच एका दुचाकीस्वाराला कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. यात त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा चेंदा मेंदा झाला. यानंतर डंपर चालक डंपर सोडून पसार झाला आहे. घटनास्थळी स्वारगेट पोलीस आणि वाहतूक विभागाचे पोलीस दाखल झाले आहेत. अद्याप त्याला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आलेली नाही.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अद्याप मयत व्यक्तीचे नाव समजू शकलेले नाही. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोडने दुचाकी चालक सारसबागेच्या समोरून आण्णा भाऊ साठे चौकात जात होता. यावेळी पालिकेच्या कचरा वाहतूक करणारा डंपर पाठीमागून वेगात आला. यात अगदी गेटसमोरच दुचाकीस्वाराला त्याने ठोकर दिली. यानंतर डंपरच्या चाकाखाली त्याचे डोके आले. यात डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रस्ता रक्ताने माखला होता. पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे उभा राहिले होते. माहिती मिळताच स्वारगेट पोलीस व वाहतूक पोलिसांनी धाव घेतली आहे. त्याचे नाव आणि पत्ता याचा शोध पोलीस घेत आहेत.

सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ महिला सहायक निरीक्षक शेख हे अधिक माहिती घेत आहेत. मयत व्यक्ती वयस्कर असून, 60 ते 65 वय आहे. ही दुचाकी हरीलाल ललवाणी या व्यक्तीच्या नावावर असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.