Pune Accident News | दुचाकीने दुभाजकाला धडक दिल्याने ज्येष्ठाचा मृत्यु

पुणे : Pune Accident News | भरधाव जाताना दुचाकीची दुभाजकाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यु (Death) झाला. (Pune Accident News)

शकील जान महंमद शेख (वय ६०, रा. रास्ता पेठ) असे मृत्यु पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. हा अपघात कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) जी एस टी भवनच्या समोर असणार्‍या पुलावरील दुभाजकावर १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील शेख हे दुचाकीवरुन जात होते. भरधाव जात असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी जी एस टी भवनसमोरील पुलाच्या दुभाजकाला धडकली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Accident News | A senior died after a two-wheeler hit a divider

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहताच चाहतीने केले ‘हे’ कृत्य; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?