Pune Accident News | कामावरुन घराकडे परतणाऱ्या 8 शेतमजूरांना भरधाव पिकअपने चिरडले, 2 चिमुकल्यांसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

आळेफाटा/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना (Farm Labour) भरधाव वेगात आलेल्या पिकअपने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर (Nagar Kalyan Highway) लावणवाडी येथे हा भीषण अपघात (Pune Accident News) झाला. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये दोन मुली, दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शेतमजुरीचे काम उरकल्यानंतर हे मजुर दोन दुचाकीवरुन पारनेरला (Parner) आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी लावणवाडी या ठिकाणी साडे अकराच्या सुमारास समोरुन आलेल्या भरधाव पिकअप जीपने (Pickup Jeep) या आठ जणांना जोरात धडक दिली. त्यात ते चिरडले गेल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला ती जागा लवणात असून दोन्ही बाजुने तीव्र उतार असून याठिकाणी वारंवार अपघात होतात.

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सुनंदाबाई रोहित मधे (वय-18), गौरव रोहित मधे (वय-6), रोहिणी रोहित मधे (वय-18), नितीन शिवाजी मधे (वय-22 सर्व रा. पळशीवनकुटे ता. पारनेर जि. अहमदनगर) असे मृत्यू झाल्यांची नावं आहेत. तर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.

अपघाताची (Pune Accident News) माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे
(Alephata Police Station) पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे (PI Yashwant Nalavde) घटनास्थळी
दाखल झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील 18 महिन्याची मुलगी रस्त्याच्या कडलेला
असलेल्या गटारात पोलिसांना सापडली. पोलिसांनी गाडी चालकावर गुन्हा (FIR) दाखल केला असून चालकाची
कसून चौकशी केली जाणार आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title :- Pune Accident News | accident pune traffic police 4 killed and 4 injured farmer alephata

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushama Andhare | संजय शिरसाटांना ‘ते’ विधान भोवणार?, सुषमा अंधारेंकडून महिला आयोगाकडे तक्रार

Maharashtra Minister Tanaji Sawant | महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिंदे, फडणवीस अन् माझ्यात 150 बैठका; तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Radhakrishna Vikhe-Patil | शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राधाकृष्ण विखे-पाटील