Pune Accident News | वाघोली परिसरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे-नगर रोडवरील (Pune-Nagar Road) वाघोली परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक अपघात (Pune Accident News) खासगी बसची धडक बसून पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. (Pune Crime News)

केसनंद फाट्याजवळ झालेल्या अपघातात पादचारी कचरा वेचकाचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, भंगार वेचण्याचे तो काम करत होता. खासगी बसच्या धडकेत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असून त्याची ओळख पटलेली नाही. याबाबत खासगी बस चालक कृष्णा लक्ष्मण वाघमारे (वय-31 रा. आव्हाळवाडी, मूळ रा. नांदेड) याच्यावर आयपीसी 304(अ), 279, 338 मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रितम भानुदास वाघ यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Accident News)

दरम्यान, गुरुवारी (दि.16) मध्यरात्री वाघोली ते राहू रस्त्यावर भरधाव दुचाकीस्वाराने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला.
सचिन राजेंद्र जगताप (वय 30, रा. देवकरवाडी, दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या प्रकरणी दुचाकीस्वार मयूर कृष्णा जाधव (वय 42, रा. कुंजीर वस्ती, मांजरी बुद्रुक)
याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील काही भागाचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद

डुकरांसह टेम्पो लांबविला, चार जणांना अटक; महाळुंगे येथील घटना

दुचाकीची ट्रकला धडक, दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना