Pune Ambil Odha Slum । आंबिल ओढा परिसरात पोलिस अन् स्थानिक रहिवाशांमध्ये राडा, अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Ambil Odha Slum । पुण्यातील (pune) दांडेकरपूल नजीक असलेल्या आंबिल ओढा परिसरात (Pune Ambil Odha Slum) अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले आहेत. त्यांच्याकडून अतिक्रमण कारवाईला (Encroachment action) सुरुवात करण्यात येत आहे. मात्र, त्यावेळी वस्तीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. त्यावेळी अनेक नागरिक जोरदार विरोध करत आक्रमक झाले आहेत. तसेच, पोलीस आणि आंबिल ओढा परिसरातील (Pune Ambil Odha Slum) नागरिकांमध्ये झटापट देखील झाली त्यावेळी काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न (Attempt to Suicide) देखील करण्यात आला आहे. pune ambil odha slum | citizen aggression against encroachment action
municipal corporation and police ambil odha area of pune attempted to suicide

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

पुणे पोलीस (Pune Police) आणि महानगरपालिका अधिकारी (Pune Municipal Corporation Officer) हे आंबिल लोढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आले असता, यावेळी वस्तीतील नागरिकांकडून याला विरोध करण्यात आला. यामुळे येथील परिस्थिती चिघळली आहे. कारवाई दरम्यान संतापलेल्या स्थानिकांनी विरोध करत ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील दिल्या आहेत. तसेच काही लोकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने येथे तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालं आहे.

वस्तीतील नागरिक या कारवाईला विरोध करत म्हणत आहेत की, पोलीस अचानक आले आणि आम्हाला घर खाली करण्यास सांगत आहेत. आम्हाला या कारवाईबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. आमचं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न तेथील स्थानिक उपस्थित करत आहेत. आम्ही कित्येक वर्ष झाली इथे राहतो आहे. आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा, असे स्थानिक म्हणून लागले आहेत. दरम्यान, महापालिका नाही तर खासगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा आरोप देखील तेथील नागरिकांनी केलाय. तर त्या नोटीशीवर पुणे पालिकेचा शिक्का का नाही, असं म्हणत नागरिक आक्रमक झाले आहेत.

निलम गोऱ्हेंचा आरोप –

मागील पंधरा दिवस मी महापालिका आयुक्त, SRA अधिकारी यांची भेट घेत आहे. 15 जुलैपर्यंत SRA च्या बाबत तक्रारीसंबंधी वेळ देण्याची मागणी करत आहे. ओढ्यामागील परिसरातील कोणतंही स्थलांतर करण्यात आलेलं नाही. केवळ SRA साठी जी जागा रिकामी करायची आहे तिथे अतिक्रमण आणि सुरक्षेच्या नावाखाली तुघलकी पद्धतीने कारवाई केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पालिका आयुक्तांना निरोप दिला असतानाही कारवाई केल्याने आश्चर्य वाटत आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन वाजता याबाबत बैठक बोलावली आहे. परंतु त्याआधीच पालिकेचा हा सगळा कारभार सुरु आहे. असा आरोप शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केल्या.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : pune ambil odha slum | citizen aggression against encroachment action municipal corporation and police ambil odha area of pune attempted to suicide

हे देखील वाचा

 

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास