दुर्देवी ! पुणे शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा ‘कोरोना’मुळं मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. हडपसर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. दरम्यान कोरोनाचा हा नववा बळी आहे.
जनार्धन रामचंद्र चिखले (वय ५७) असे मृत्यू झालेल्या सहाय्यक निरीक्षकाचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन चिखले मागील पाच वर्षांपासून हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. १८ सप्टेंबरला त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांचा आज मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिस दलात कोरोनाचा हैदोस सुरुच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात जवळपास 1200 हुन अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 90 टक्के पोलीस बरे होऊन पुन्हा कर्तव्यावर हजर देखील झाले आहेत. पण कोरोनाने आतापर्यंत शहर पोलीस दलातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.