Pune ATS | ATS च्या अटकेत असलेल्या जुनैद मोहम्मदच्या चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ATS | पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (Pune ATS) दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील दापोडी (Dapodi) परिसरातून अटक केली आहे. जुनैद मोहम्मद Junaid Mohammed (वय-28) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून काश्मीरमधील (Kashmir) अतिरेकी संघटनेकडून फंडिंग (Funding) झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जुनैद याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने 10 जणांना दहशतवादी संघटनेत भरती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली आहे.

 

जुनैद हा जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथील दहशतवादी संघटना (Terrorist Organization) ‘लष्कर-ए-तय्यबा’ (Lashkar-e-Taiba) च्या सक्रिय सभासदांच्या संपर्कात होता. त्यांच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यातील तरुणांना ‘लष्कर -ए-तय्यबा’ या अतिरेकी संघटनेत भरती करुन, त्यांना आतंकवादी करावाया करण्याचे प्रशिक्षण (Training) देण्याकरिता जम्मू काश्मीर येथे नेण्याचा प्रयत्न करीत होता. या कामासाठी त्याला जम्मू काश्मीर येथील खात्यावरुन त्याच्या बँक खात्यावर रक्कमा जमा जमा झाल्या असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. तसेच चौकशीमध्ये त्याने अल्पकालावधीत वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे 10 सीमकार्ड वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्येक संवादानंतर सीमकार्ड नष्ट करणे व नविन सीमकार्ड घेण्याची त्याची कार्यपद्धती होती.

जुनैद मोहम्मद याला पुणे एटीएसने (Pune ATS)  मंगळवारी (दि.24) अटक करण्यात आली असून,
उर्वरित 3 आरोपी फरार झाले आहेत. त्याला न्यायालयाने 3 जून पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने 10 जणांना दहशतवादी संघटनेत भरती केल्याची माहिती दिली,
असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्र (Maharashtra) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील तरुणांना जुनैदने दहशतवादी संघटनेत भरती केलं.
10 जणांपैकी काही मारले गेले, काही जणांना अटक झाली. जुनैदला पुणे एटीएसने मंगळवारी ताब्यात घेतले.

 

Web Title :- Pune ATS | pune youth being funded by kashmir terrorists organisation pune anti terrorism squad arrest junaid mohammed lashkar e taiba

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Crime | 40 वर्षाच्या प्रेयसीसोबत झोपलेल्या 61 वर्षाच्या प्रियकरचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

 

MSEDCL SMS Alert | वीजग्राहकांची बनावट SMS द्वारे आर्थिक फसवणूक ! वैयक्तिक मोबाईल क्रमांकाच्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका – महावितरण

 

Tata Group | रू. 1170 वर जाईल टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर, आता डाव लावल्यास होईल जबरदस्त नफा, एक्सपर्ट म्हणाले – ‘खरेदी करा’