कोंढव्यात ऐकमेकांकडे पाहण्यावरून तरुणावर कोयत्याने वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – ऐकमेकांकडे पाहिल्यावरून तरुणावर सपासप वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे. रिक्षीत नायर (वय 21, रा. वडाचीवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायर काल रात्री सव्वा बाराच्या सुमारास कोंढवा परिसरातील कॅफे बर्गर स्पाईस हॉटेलसमोर मित्राची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी ओळखीच्या तरुणाकडे हातात कोयता असल्याचे नायर यांनी त्याच्याकडे पाहिले. याचा राग आल्याने कोयता धारी आरोपीने नायर यांच्यावर वार करुन जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.