Pune-Bangalore Highway | निपाणीजवळील यमगर्णी पुलावर पुराचे पाणी आल्याने पुणे -बंगलोर महामार्ग बंद ! पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रस्ते दरडी, पूरामुळे बंद, बाहेर जाण्यापूर्वी करुन घ्या माहिती

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) वेदगंगा नदीचे पाणी (Vedganga river) निपाणीजवळील यमगर्णी  पुलावर (Yamagarni bridge) आल्याने पुणे-बंगलोर महामार्ग (Pune-Bangalore Highway) बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास या पुलावर पाणी आले. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वाहने सौदंलगा गावाजवळ महामार्गावरुन वाहत आलेल्या पाण्यात अडकली आहेत. या वाहनांतील ८ जणांना कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) सुखरुप बाहेर काढले आहे. निपाणीकडून येणारी वाहने यमगर्णी गावात तर कोल्हापूरहून (Kolhapur) जाणारी वाहने सौदंलगा गावाजवळ रोखून धरण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी पुलावरुन सात ते आठ फुट पाणी वाहत आहे. २०१९ मध्येही आलेल्या पुरामध्ये या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने महामार्ग (Pune-Bangalore Highway)
बंद झाला होता.

कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २०४ वर घाट रस्त्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असल्याने तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला.

कोल्हापूर – गगनबावडा राज्य मार्ग क्रमांक ११४ या मार्गावरील गगनबावडा घाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तसेच पंचगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.

Pune-Bangalore Highway | Pune-Bangalore highway closed due to flood water on Yamagarni bridge near Nipani! Many roads in western Maharashtra are closed due to flooding

कोल्हापूर -चंदगड राज्य मार्ग क्रमांक १३०

इस्लामपूर -मलकापूर, अनुसकुरा राज्य मार्ग क्रमांक १११

कोल्हापूर – गारगोटी राज्य मार्ग १३२

असे काही राज्य व राष्ट्रीय महामार्ग मुसळधार पावसामुळे वाहतूकीला बंद करण्यात आले आहे. कोल्हापूर चारही बाजूने पाण्याने वेढले गेले आहे. पंचगंगा नदीचे पाणी शहरात घुसले आहे. शहरातून कोकण, गोवा, चंदगड परिसरात जाणार्‍या रस्त्यांवर पाणी आल्याने ते बंद झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूरातून कोकणातून संपर्क तुटला आहे.

हे देखील वाचा

Pune Crime | रायगडमधील 7 एक्कर जमीन व पिंपळे गुरव येथील जागा जबरदस्तीने बाळकवण्यासाठी डोक्याला पिस्तुल लावून हवेत गोळीबार; ‘उद्योजक’ कुटुंबावर FIR

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune-Bangalore Highway | Pune-Bangalore highway closed due to flood water on Yamagarni bridge near Nipani! Many roads in western Maharashtra are closed due to flooding

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update