बारामतीमधील गुटखा सप्लायरवर पोलिसांची मोठी कारवाई, चौघांवर FIR दाखल, 2.25 लाखांचा गुटखा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गुटखा बंदी असताना त्याची विक्री तेजीत सुरू असून, बारामती शहर आणि यवत परिसरात पोलिसांनी गुटखा सप्लायरवर छापी मारी करत सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. तर, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बंदी असतानाही गुटख्याची तेजीत विक्री सुरू असल्याचे पाहिला मिळत आहे.

सुरज रमेश साळुंखे (रा. बारामती) आणि सचिन संपतलाल कोठारी (रा. बारामती) यांच्यावर बारामती शहर तसेच हस्तीमल जवाहरलाल पितळे (रा. केडगाव बाजार मैदान, ता. दौंड) व प्रवीण सुरेश बारवकर (कुरकुंभ, ता. दौंड) या दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुटखा बंदी आहे. परंतु, त्यानंतरही राज्यभरात त्याची सरास विक्री होते. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुटख्यावरकडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, जिल्ह्यात बारामती विभागाचे संजय मीना यांना बारामती व यवत परिसरात गुटख्याची साठवूनक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, या माहितीची खातजमा करण्यात आली. त्यावेळी गुटख्याचे गोडाऊन या परिसरात असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी साळुंखे, कोठारी तसेच, पितळे व बारवकर यांनी साठवणूक केलेल्या गोडाऊनवर छापेमारी केली. त्याठिकाणी पोलिसांना सव्वा दोन लाख रुपयांचा गुटखा मिळून आला आहे. ही कारवाई बारामती गुन्हे शाखेचे चंद्रशेखर यादव, कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदिप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.