Pune : पार्क केलेली दुचाकी जाळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी जाळून खाक केल्याची घटना दत्तवाडी परिसरात घडली. तर दुचाकी चालकाच्या नातेवाईकांना मेसेजद्वारे धमकवण्यात आले आहे.

याप्रकरणी गोपाळ जाचक (वय 34) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दत्तवाडी परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान त्यांनी त्यांची ज्युपिटर गाडी घरासमोर पार्क केली होती. त्यावेळी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी दुचाकी पेटवून दिली. यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना ह प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीची आग विझवली. मात्र त्यानंतर त्यांच्या एका नातेवाईकांना त्यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज करण्यात आला. आता पोलीस त्या मोबाईल क्रमांकावरून आरोपींचा शोध घेत आहेत. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.