Pune Chandan Nagar Crime | पुणे : पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण अन् बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Chandan Nagar Crime | तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने कारमधू पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करुन शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.15) सकाळी साडे आठ ते शुक्रवारी (दि.16) सकाळी साडेआठ या दरम्यान खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप व दस्तुरवाडी गावच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. (Pune Rape Case)

याबाबत वाघोली येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police) फिर्याद दिली आहे. यावरुन महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी ता. हवेली, जि. पुणे), अमोल जाधव (रा. लोणीकंद ता. हवेली) यांच्यावर आयपीसी 376, 366 अ, 506, आर्म अॅक्ट, अॅट्रोसीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला असून महेंद्र वेताळ याला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास अटक केली आहे. हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.(Pune Chandan Nagar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गुरुवारी सकाळी खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप येथे जात होती.
त्यावेळी अचानक एक चारचाकी पांढरी कार (एमएच 12 व्हीएफ 2648) तिच्याजवळ येऊन थांबली.
आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवला.
तिचे अपहरण करुन आरोपी महेंद्र वेताळ याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

यानंतर नाशिक रोडने दस्तुरवाडी गावच्या हद्दीतील एका डोंगरावर नेऊन तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच तिला जातीवाचक शिवीगाळ करुन तिला तुळापुर फाटा येथे आणून सोडून देऊन आरोपी पळून गेले.
यानंतर तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली.
पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Asha Bhosle Granddaughter Zanai | आशा भोसलेंची नात ‘जनाई’चा भन्नाट डान्स पाहुन चाहते अवाक, म्हणाले – ”माधुरी-ऐश्वर्या देखील फेल”

Manoj Jarange Patil | ‘कुणबी नोंदी नसणाऱ्यांना आयोगाच्या अहवालानुसार मराठा आरक्षण अमान्य’ : जरांगे

State Backward Classes Commission On Maratha Reservation | राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर, १० टक्के मराठा आरक्षणाचा होऊ शकतो कायदा

Paytm-Axis Bank | Paytm चा Axis बँकेशी करार, १५ मार्चनंतर सुद्धा चालणार QR, साऊंड बॉक्स आणि EDC

3 Cops Dismissed In Pune | पुणे: हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ; अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची कारवाई