KYC अपडेट करण्याच्या बहाण्यानं फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   केवायसी अपडेट करण्याचे बहाण्याने एकाला सायबर चोरट्यांनी सव्वा लाखाला गंडा घातला आहे. तर शहरात रस्त्यावरील गुन्हेगारीसोबतच सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

याप्रकरणी नईम शेख (वय 44) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार फेब्रुवारी 2020 मध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वडगाव शेरी परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच, तसेच त्यांना पेटीएम ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तर तुमचे पेटीएमची केवायसी अपडेट करावी लागते असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ऑनलाइनरीत्या 1 लाख 12 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख हे तपास करत आहेत.