Pune : कॉलेज खरेदी करण्यासाठी 10 कोटीचं कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्यानं तिघा मित्रांना 15 लाखांना गंडवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यात काय घडेल काही सांगताच येत नाही, असच काही प्रकार तीन मित्रांसोबत घडला असून, त्यांना चक्क कॉलेज खरेदीकरण्यासाठी 10 कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने 15 लाख रुपयांना गडवले असल्याचे उघडकीस आले आहे. 2018 ते 2020 या काळात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी फरीद शेख (वय 51, रा. घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांना व त्यांच्या मित्रांचीनआरोपींशी 2018 मध्ये ओळख झाली होती. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांना कॉलेज खरेदी करण्यासाठी एका फायनान्स कंपनीत ओळख असून, तेथील मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची माहिती दिली. तसेच त्यांना 10 कोटींचे कर्ज 30 ते 45 दिवसात मंजूर करून देण्याचा बहाणा करत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याशी ओळख वाढवून कर्ज मंजूर करण्यासाठी 1 टक्का प्रोसेसिंग फी व प्रीमियम खाते काढण्यासाठी म्हणून त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले. पण त्यांना कर्ज मंजूर करून दिले नाही. यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान फायनान्स कंपनीत जी व्यक्ती मोठ्या पदावर काम करते असे सांगितले होते, ती प्रत्यक्षात आरोपींनी बनावट व्यक्ती उभा करून तोच मोठ्या पदावर असल्याचे भासवली होते. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पैसे परत मागितले. पण त्यांनी पैसे परत दिले नाही. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.