गृहनिर्माण सोसायटीची पाच लाखांची फसवणूक; अध्यक्षासह समितीवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गृहनिर्माण सोसायटीची 5 लाखांची शिल्लक रक्कम जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्यामुळे पौड रस्त्यावरील राहूल कॉम्पलेक्स सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षासह प्रशासकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ए. टी. जाधव यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रवीण ढमाळ (वय 44, रा. काळेवाडी) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फेब्रु वारी 2009 ते जानेवारी 2012 आणि जानेवारी 2012 ते मार्च 2015 कालावधीत ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रस्त्यावर राहूल गृहनिर्माण सोसायटी असून त्या सोसायटीचे ए.टी. जाधव यांच्यासह इतर दोनजण प्रशासक म्हणून कार्यरत होते. पेैबु्रवारी 2009 ते जानेवारी 2012 आणि जानेवारी 2012 ते मार्च 2015 कालावधीत तिघांनी सोसायटीचे 5 लाख रुपये जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे लेखापरिक्षणामध्ये निष्पन्न झाले. त्यानुसान तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव अधिक तपास करीत आहे.