नोकरीच्या आमिषाने तरुणीला 83 हजारांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्लेसमेंट कन्सलटन्सी धारकांनी एका तरुणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने 83 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2019 कालावधीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कर्वेनगरमध्ये राहण्यास आहे. तिने सोमवार पेठेतील युनिय आयडिया बिझ इनफो प्रायव्हेट लिमीटेड प्लेसमेंट कन्सलटन्सीमध्ये नोकरीसाठी नोंदणी केली होती. त्यानंतर संबंधित कन्सटल्सीमधील पाचजणांनी तरुणीला नोकरीच्या आमिष दाखविले. तसेच, तिचा विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून 82 हजार 500 रुपये ऑनलाईनरित्या स्वतःच्या बँकखात्यावर भरण्यास भाग पाडले. तरुणीला बनावट कंपनीचे जॉईनिंगचे लेटर पाठविण्यासाठी पाचजणांनी प्लेसमेंट कंपनीच्या मेलचा वापर करुन फसवणूक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम अधिक तपास करीत आहेत.