पुण्यात नोकरीच्या अमिषाने पावणे दोन लाख उकळले

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन – परदेशात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका तरूणाची पावणे दोन लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. ऑगस्ट 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत ही घटना घडली आहे.

याप्रकरणी कुणाल राजपूत यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, कुणालने उच्च शिक्षण पुर्ण केले असून त्यांनी नोकरीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यानुसार सायबर चोरट्याने त्यांना फोन करुन परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वारंवार संपर्क साधून गुुगल पे अ‍ॅपवर 1 लाख 68 हजार रुपये भरण्यास सांगितले. नोकरीच्या आमिषाने राजपूत यांनी टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली. मात्र, नोकरी न लागल्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चेतन मोरे अधिक तपास करीत आहेत.