Pune Cheating Fraud Case | पुणे : MNGL चे बिल भरण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला 16 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cheating Fraud Case | एमएनजीएलचे बिल भरण्याचे बाकी आहे ते तात्काळ भरा असे सांगून सायबर गुन्हेगारांनी शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सायबर चोरट्यांने राहुल शर्मा असे नाव सांगून तो एमएनजीएल चा कर्मचारी असल्याचे भासवून 16 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केली.

याबाबत भरत उमाजी पाडेकर (वय-66 रा. कुणाल आझोन, सिमला ऑफिस, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 27 ते 28 मार्च या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन आला. एमएनजीएल कडून राहुल शर्मा बोलत असल्याचे सांगितले. तुमचे मागील महिन्याचे वीजबिल भरलेले नाही, ते तात्काळ भरा असे सांगितले. (Pune Cheating Fraud Case)

त्यानंतर एक अप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.
अप्लिकेशनचा वापर करुन रिमोट अॅक्सेस मिळवला.
फिर्यादी यांच्या खासगी माहितीचा वापर करुन फिर्यादी यांच्या बँक खात्यातून परस्पर 16 लाख 22 हजार 310 रुपये लोन घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्य़ादी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन