Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 142 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 142 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 243 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 87 हजार 563 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 76 हजार 478 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8779 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2306 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2306 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 218 रुग्ण गंभीर आहेत. तर 345 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8200 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 28 लाख 95 हजार 106 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title :  Pune Corona | 142 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले – ‘मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते, पण…’

Suicide in Karmala | करमाळ्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Maharashtra Government | आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केट्समध्येही मिळणार ‘वाइन’; राज्य सरकारचं नवं धोरण लवकरच