Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 222 नवीन रुग्णांचे निदान, अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात रुग्ण वाढत असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे थोडी चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 222 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 107 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96 हजार 100 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 84 हजार 691 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8935 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 2474 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2474 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 204 रुग्ण गंभीर आहेत. तर 276 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 9484 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे. आतपर्यंत 31 लाख 52 हजार 951 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 222 new corona patients diagnosed in Pune in last 24 hours, increase in active patient population, know statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption | महिलेकडे 30,000 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Pune Corporation | ‘भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून पुणे मनपातील भ्रष्टाचाराने कळस गाठला’ – राष्ट्रवादी

125 Rupee Coin | जारी करण्यात आलं 125 रुपयांचे ‘हे’ विशेष नाणे, जाणून घ्या ते कसे आणि कुठून खरेदी करायचे?