Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 244 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Corona |पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 244 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 205 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96 हजार 344 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 84 हजार 896 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8940 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2508 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9011 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 31 लाख 61 हजार 962 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2508 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 204 रुग्ण गंभीर आहेत.
तर 289 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title : Pune Corona | 244 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sangli Crime | धडक करावाई ! नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांचा छापा

Medha Kulkarni | अव्दितीय अन् अलौकिक ! मेधा कुलकर्णींनी घेतली पंतप्रधानांची भेट, PM मोदींना राखी बांधुन केली ‘ही’ विनंती

CM Uddhav Thackeray | ‘तुम्ही चिंता करु नका, लवकर बऱ्या व्हा, तुमच्या धैर्याचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत’