Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 96 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. आज (रविवार) दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona) 96 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 85 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

 

रविवारी पुणे शहरात 5 हजार 989 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 96 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत करण्यात आलेल्या एकूण 37 लाख 53 हजार 417 प्रयोगशाळा तपासणीत 5 लाख 7 हजार 675 जणांना कोरोनाची बाधा (Pune Corona) झाली आहे. यापैकी 4 लाख 97 हजार 778 रुग्णांनी कोरोनामवर मात केली आहे.

 

शहरात रुग्णांची संख्या कमी होत असताना शहरात मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवारी शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरात 9 हजार 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या शहरामध्ये 789 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 82 रुग्ण गंभीर आहेत. तर 44 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona | 96 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा