Pune Corona Restriction | पुण्यातही कोरोना निर्बंध शिथील होणार?

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यातील निर्बंध शिथील (Pune Corona Restriction) करण्यात येणार आहेत. राज्यातील 25 जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत तर 11 जिल्ह्यात निर्बंध तसेच राहणार आहेत. 11 जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश असल्याने पुण्यातील निर्बंध (Pune Corona Restriction) कायम राहणार आहेत. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून निर्बध शिथील करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले आहेत.

पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्याबाबत मुखयमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची चर्चा झाली असून, येत्या एक ते दोन दिवसांत पुणे व पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका क्षेत्र तसेच पुणे जिल्ह्याला (Pune district) दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल असे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.
निर्बंधामध्ये पुण्याला काही प्रमाणात निश्चितपणे सूट मिळेल असेही वळसे पाटील म्हणाले.
ते पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

 

Web Title : Pune Corona Restriction | restrictions in pune will be relaxed to some extent says dilip walse patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sanjay Raut | संजय राऊतांचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना टोला, म्हणाले…

Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं