Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 8 जणांचा मृत्यू तर 108 नवे पॉझिटिव्ह, दिवसभरात 194 बाधित झाले बरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर नवीन 108 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 194 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


पुणे शहरात एकुण 6201 कोरोनाबाधित असून त्यापैकी 3644 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2248 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यांचावर नायडू, ससून आणि इतर खासगी रूग्णालयात उपचार चालु आहेत. त्यापैकी 170 रूग्ण हे क्रिटिकल आहेत. क्रिटिकल रूग्णांपैकी 43 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 309 जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे. मात्र, अलिकडील काळात उपचार होऊन बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 30 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. दरम्यान, काही सूट देखील देण्यात आली आहे.