Pune Corona Vaccination | पुणेकरांनो… लस घेण्यासाठी जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत (Pune Corona Vaccination) मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्यातील कोरोना लसीकरण (Pune Corona Vaccination) तीन दिवस बंद असणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये (government hospital) उद्यापासून (गुरुवार) तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. गुरुवार, शनिवार आणि रविवारी लसीकरण बंद राहणार आहे. मात्र शुक्रवारी सकाळच्या सत्रातील लसीकरण सुरु राहणार आहे.

पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर (Dr. Suryakant Deokar) यांनी सांगितले की, सरकारी रुग्णालयांमधून सुरु असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Pune Corona Vaccination) दिवाळीमध्ये तीन दिवस बंद (Vaccination closed) राहणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरु राहील. दिवाळी सणात लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पुण्यात 18 वर्षावरील 100 टक्के पुणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आता लसीचा दुसरा डोस नागरिकांनी घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

मागील दोन महिन्यांपासून पुण्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र, दिवाळीपूर्वी केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येत्या गुरुवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार आहेत, अशी माहिती डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

 

30 नोव्हेंबर पर्यंत 100 टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री

विक्रमी संख्येने दर दिवशी कोरोना लस देण्याची राज्याची तयारी आहे. यापूर्वी देखील डोस दिले आहेत.
आता लसीकरणाला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)
यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावं,
असं उद्दिष्ट्य राज्यातील विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) आणि जिल्हाधिकारी (Collector) दिले आहे.
त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवला जाणार आहे. त्यासाठी आता घरोघरी जाऊनही लसीकरण मोहीम राबवण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Corona Vaccination | corona vaccination in pune will be closed for three days from tomorrow thursday saturday and sunday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वाळू व्यावसायिक संतोष जगतापची ‘गेम’ करण्यास गावठी पिस्तुल पुरवणाऱ्या दोघांच्या आवळल्या मुसक्या

Modi Government | मोदी सरकारने 6.5 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये पाठवली दिवाळीची भेट, तात्काळ ‘या’ पद्धतीने जाणून घ्या शिल्लक

PM KISAN | पती-पत्नी दोघेही घेऊ शकतात का पीएम किसान योजनेतून वार्षिक 6,000 रुपये? जाणून घ्या नवीन नियम