Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चा कहर कायम ! गेल्या 24 तासात 5395 नवीन रुग्ण, 68 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासत 5 हजार 395 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 68 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 44 हजार 924 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 50 रुग्ण शहरातील आहेत तर 18 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 951 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 4 हजार 321 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 89 हजार 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (गुरुवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 21 हजार 922 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 54 हजार 351 इतकी आहे. त्यापैकी 1172 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 6 लाख 76 हजार 14 रुग्णांपैकी 5 लाख 68 हजार 2 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 97 हजार 115 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 हजार 897 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.61 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.02 टक्के आहे.