Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना बाधित (Coronavirus in Pune City) रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील (Pune City) नवीन रुग्णांची (New patient) संख्या पाचशेच्या आत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 295 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पुणे शहरात गेल्या 24 तासात 295 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 74 हजार 840 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 09 रुग्ण शहरातील आहेत तर 11 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात 2 हजार 738 रुग्ण सक्रीय आहेत.

 

पुण्यात 451 रुग्ण गंभीर

दरम्यान 451 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 63 हजार 601 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 958 स्वॅब तपासणी (Swab check) करण्यात आली. आज पर्यंत शहरात 25 लाख 92 हजार 930 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory test) करण्यात आल्या आहेत. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी (Active patient) 451 रुग्ण गंभीर आहेत. तर 703 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार (Treatment on oxygen) घेत आहेत. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department of Pune Municipal Corporation) दिली आहे.

पुणे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 %
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना (Corona) बाधीत एकूण 10 लाख 34 हजार 59 रुग्णांपैकी 10 लाख 5 हजार 327 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 11 हजार 347 आहे.
कोरोना बाधित एकूण 17 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.22 टक्के आहे.

Wab Title :- pune coronavirus news updates today

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये