Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 969 नवे पॉझिटिव्ह तर 22 जणांचा मृत्यू

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरातून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 969 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 7 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळं पुणे शहरात तब्बल 3731 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात 1060 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 51 हजार 402 वर पोहचली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 33 हजार 600 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 14 हजार 71 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 908 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 493 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार दिले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.