Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 808 रूग्ण उपचारानंतर झाले बरे, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर बदली करीत आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासनानं सोमवारपासून (दि.13 जुलै) 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 827 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आज दिवसभरात तब्बल 808 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आता एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 26904 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये 9092 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत तर तब्बल 16996 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या 827 पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये ससूनमधील 5, नायडूमधील 678 आणि खासगी रूग्णालयातील 144 रूग्णांचा समावेश आहे. आज समोर आलेल्या 827 रूग्णांपैकी 461 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यामधील 64 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दिवसभरातील सर्वात मोठी बाब म्हणजे तब्बल 808 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता एकुण बाधित रूग्णांपैकी तब्बल 16996 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत पुणे शहरात 816 जणांचा मृत्यू झाला आहे.