Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’मुळं 9 जणांचा मृत्यू तर 800 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत जात आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्याच्या प्रशासनानं आज (सोमवार) मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात पुणे शहरात कोरोनामुळं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात तब्बल 832 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळं 849 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात सध्या एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 28357 वर जावुन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 18096 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पुणे शहरातील अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 9412 एवढी आहे. आज आढळून आलेल्या 832 रूग्णांपैकी 21 रूग्ण ससून, 658 रूग्ण हे नायडू तर 153 रूग्ण हे इतर खासगी रूग्णालयातील आहेत. अ‍ॅक्टीव्ह असलेल्या रूग्णांपैकी 486 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 174 रूग्ण हे व्हेंटिलेटरवरून उपचार घेत आहेत. आज दिवसभरात तब्बल 614 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत 18096 रूग्ण हे कोरोनातुन बरे झाले आहेत.