Pune Corporation | आर सेव्हन अंतर्गत पालिकेच्या ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये घुसखोरी ! 7 दिवसांत सदनिका न सोडल्यास गुन्हा दाखल करून साहित्य जप्त करणार

महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी बजावली नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महापालिकेने (Pune Corporation) आर ७ अंतर्गत ताब्यात घेतलेल्या सदनिकांमध्ये काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबधित नागरिकांनी येत्या सात दिवसांत सदनिका रिकाम्या कराव्यात अन्यथा संबधितांवर गुन्हा दाखल करण्यासोबतचत्या सर्व सामानासह ताब्यात घेण्यात येतील, अशी नोटीस आज महापालिकेच्या (Pune Corporation) मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे (rajendra muthe pmc) यांनी बजावली आहे.

बांधकाम नियमावलीतील आर ७ अंतर्गत मिळणार्‍या सदनिकांवर महापालिकेची मालकी आहे. या सदनिका प्रामुख्याने प्रकल्प विस्थापितांना भाडेतत्वावर देण्याचे प्रयोजन आहे. महापालिकेला आर ७ अंतर्गत मिळालेल्या सदनिकांमध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प विस्थापित भाडेकरू म्हणून राहात आहेत. परंतू काही ठिकाणी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या पाहाणीत आढळून आले आहे. संबधित नागरिकांनी येत्या सात दिवसांत या सदनिका सुस्थितीत रिकाम्या कराव्यात. अन्यथा या सदनिकांमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश केल्याप्रकरणी ट्रेसपासचा गुन्हा दाखल करून सर्व साहित्यासह सदनिका ताब्यात घेण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आल्याचे राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Corporation | Infiltration of flats in the possession of the municipality under R-Seven! If he does not leave the flat within 7 days, he will file a case and confiscate the materials

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption | महिलेकडे 30,000 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

125 Rupee Coin | जारी करण्यात आलं 125 रुपयांचे ‘हे’ विशेष नाणे, जाणून घ्या ते कसे आणि कुठून खरेदी करायचे?

Pornographic Content | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने फसवणुकीच्या केसमध्ये दिल्ली पोलिसांकडे मागितला ATR