Pune Corporation | एक कोटी रुपयांची बोगस बिले ! फौजदारी आणि प्रशासकीय चौकशी देखील करणार; अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांचे सर्वसाधारण सभेत आश्वासन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corporation | पूर्वगुणन पत्र तयार केले नव्हते, निविदा काढली नव्हते तरी आशय इंजिनिअरच्या नावाने ऑडिट विभागाकडे एक कोटी रुपयांच्या बिलाची फाईल (Fake Bill) गेली. हे लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय चौकशीसाठी (Pune Corporation) दक्षता विभागाची समिती स्थापन करण्यात येईल. फौजदारी कारवाई व प्रशासकीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (pmc additional commissioner dr Kunal Khemnar) यांनी आज सर्वसाधारण सभेत दिले.

 

कोरोनाकाळात स्मशानभूमीतील कामांच्या निविदा न काढताच सुमारे एक कोटी रुपयांची बोगस बिले सादर केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या बिलांचा प्रवास अगदी इनवर्ड पासून ऑडिट विभागपर्यंत झाला होता. कामे न करताच महापालिकेच्या (Pune Corporation) तिजोरीवर दरोडा टाकण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे (MNS Vasant More) आणि गटनेते साईनाथ बाबर (MNS Group Leader Sainath Babar) यांनी आज सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर आंदोलन केले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेही त्यांच्या आंदोलनाला साथ देत या विषयावरील चर्चेची मागणी केली.

 

पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) म्हणाले, एक विषय समोर आलाय. असे काम न करता बिले काढण्याचे प्रकार मागील 2 वर्षात झालीत. मागेही निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या बोगस सह्या करून पेमेंट दिले गेले, त्याप्रकरणात काहीच कारवाई झाली नाही. महापालिका (Pune Corporation) भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. चुकीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे धाडस करा.

 

विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ (PMC Leader of Opposition Deepali Dhumal) म्हणाल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या हातातून फाईल गेल्यानंतर अखेरच्या टप्प्यात एका अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येते, ही गंभीरबाब आहे. कोरोना काळात झालेल्या विषयांची चर्चा केली जात नाही. त्यामागचे कारण पुणेकरांना कळले पाहिजे. खास सभा घ्यावी अशी मागणी आहे.

 

आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) म्हणाले, स्मार्ट सिटी मध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरत असताना एक फाईल चा प्रवास इतक्या दूरपर्यंत कसा जातो. स्मशानभूमी, दफनभूमीच्या ठिकाणी देखील भ्रष्टाचार होतोय ही गंभीर बाब आहे.

 

 

वसंत मोरे म्हणाले संपूर्ण शहर कोरोनासाठी एकजुटीने काम करत असताना काही जण मलई खायचं काम करत होते. बनावट बिले सादर करून स्मशान भूमीतील कामाच्या नावाखाली पैसे लुटण्याचा प्रयत्न करत होते. हे महापालिका बदनाम करायचा प्रयत्न आहे. बिलाच्या फाईलचा सर्व प्रवास झाला आहे. त्यावर अगदी billed चा शिक्का पडलाय. ज्या अधिकाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला, त्याचा सत्कार करा. पण यामागे कोण आहेत, त्या अधिकाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई देखील करा.

 

अविनाश बागवे (corporator avinash bagwe) म्हणाले, प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. निविदाच अस्तित्वात नसताना बिलं काढली जातात, ही गंभीर बाब आहे. संबंधित ठेकेदाराला कोणत्या अधिकाऱ्यांनी ही बिले सादर करायला सांगितले. नावे घेऊ नये म्हणून ठेकेदाराला धमकवण्यात आले आहे. विद्युत विभागाने 20 माणसाची गरज असताना ठेकेदारांची 50 माणसे भरली जाताहेत. वैकुंठ मधील पर्मनंट कामगारांना इतरत्र ड्युटी दिली जातेय, यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. कोरोनाच्या काळात किती खोटी बिले काढली याचा खुलासा करावा.

 

 

 

अरविंद शिंदे (Corporator Arvind Shinde) म्हणाले, अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही.
कोरोना काळातील कामाचा व खर्चाचा अद्याप हिशेब दिला नाही.
विद्युत विभागात उलट सुलट कामे होत असताना प्रशासन त्या विभागाचे अधिकारी श्रीनिवास कंदुल (Sriniwas Kandul) यांना पाठीशी घातले जातेय.
अनेक पुरावे देऊन ही भ्रष्टाचाराच्या एकाही प्रकरणावर प्रशासन कारवाई करत नाही.
थोडक्यात वरिष्ठांच्या पाठिंब्याशिवाय हे होऊच शकत नाही.

 

गफूर पठाण (Corporator Gafur Pathan) म्हणाले , कोरोना काळातील ऑनलाईन सभांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झालाय.
ज्यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे. साईनाथ बाबर यांचेही यावेळी भाषण झाले.

 

सभागृह नेते गणेश बिडकर (pmc leader of house ganesh bidkar) म्हणाले, भ्रष्टाचाराच्या आरोपात सापडणाऱ्याला एकालाही पाठीशी घालू नका.
ज्यादिवशी हा प्रकार समजला त्यावेळी तातडीने गुन्हा दाखल करा असे आयुक्तांना सांगितले.
लॉकिंगसाठी ही फाईल आरोग्य विभागाकडे गेल्यावर हा प्रकार लक्षात आला.
विद्युत विभागाने ही असा ठराव आम्ही पाठवलेला नाही असे आरोग्यला कळवले.
त्याचदिवशी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) तक्रार केली.
प्रशासनाचे बारकावे माहिती असलेल्या व्यक्तिशिवाय अशी बोगस बिले (Fake Bill) तयारच होऊ शकत नाही.
त्यामुळे कोणाला पाठीशी घालू नका. भ्रष्टाचाऱ्यावर कारवाई करण्यास कोणी अडवले नाही.

 

Web Title :- Pune Corporation | One crore rupees bogus and fake bills! Will also conduct criminal and administrative inquiries; PMC Additional Commissioner Dr Kunal Khemnar Assurance in the general meeting

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा