Pune Corporation | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद मनपाच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Corporation | आगामी महापालिका निवडणुकीच्या (PMC Elections) निमित्ताने प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करायची मुदत उद्या ( दि.३०) संपुष्टात येत आहे. मात्र आद्यप प्रभाग रचना व परिशिष्ठांचे कामच पूर्ण न झाल्याने आराखडा सादर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे (Pune Corporation) निवडणूक अधिकारी उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी दिली.

 

राज्य शासनाने बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका (Local body elections) घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर नोव्हेंबर च्या पहिल्याच आठवड्यात 30 नोव्हेंबर पर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. विशेष असे की हा निर्णय झाल्यानंतर लोकसंख्या वाढीनुसार नगरसेवकांची (corporator) संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने (Maharashtra government) घेतला. या सततच्या बदलणार्‍या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचना व अन्य तांत्रिक बाबींमध्ये विलंब होत गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच मागील आठवड्यात पुण्यासह (Pune Corporation), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Corporation) आणि औरंगाबाद (Aurangabad Corporation) या तीन महापलीकांनी कच्चा प्रभाग आराखडा सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले होते.

Pune Corporation | State Election Commission extends Pune, Pimpri-Chinchwad and Aurangabad Municipal Corporation's ward structure

प्रभाग रचनांमध्ये राजकीय हस्तक्षेप ही नवीन गोष्ट राहिली नाही. राज्यात सध्या शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आहे. या तीनही पक्षही राज्यातील विविध महापलिकात बलस्थाने आहेत. त्यामुळे एकमेकांना जोखत पूर्वी सत्ता असलेल्या महापालिकांत सत्ता स्थापन करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. प्रामुख्याने प्रभाग रचनेपासूनच ही झोम्बाझोम्बी सुरू असल्याने अनेक ठिकाणी एकमत होत नसल्याने प्रभाग रचना पूर्ण करण्यात प्रशासनापुढे अडचणी येत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

 

Web Title : Pune Corporation | State Election Commission extends Pune, Pimpri-Chinchwad and Aurangabad Municipal Corporation’s ward structure

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Devendra Fadnavis | राज ठाकरेंच्या घरी भाजप-मनसे युतीवर चर्चा? माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Omicron Variant | ’ओमिक्रॉन’ किती धोकादायक? सध्याची लस प्रभावी ठरेल का? कशी आहेत लक्षणं? WHO नं याबाबत केलं सावध, जाणून घ्या

Anushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती ! बॅकलेस मोनोकनी आणि स्कूबा डायव्हिंग करत शेअर केले फोटो आणि व्हिडीओ